Home धर्म-समाज बोदवड येथे युवक कॉंग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

बोदवड येथे युवक कॉंग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

0
51

बोदवड, प्रतिनिधी ।   शहरातील ग्रामीण रुग्णालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप, सँनिटायझर व मास्क वाटपाचा कार्यक्रम युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या ऊपस्थितीत पार पडला. 

शहरातील डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटल असलेल्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम रुग्णांना चहा व बिस्किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मास्क, सँनिटायझर व फळांचा कँरेट रुग्णांना वाटण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैदयकीय अधिक्षकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ तायडे, डॉ. शिल्पा शर्मा, डॉ. कल्याणी चौधरी यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रीय छावा संघटनेचे तालूकाध्यक्ष गजानन पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त मानमोडी व सुरवाडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रत्येकी निंबाचे १०-१०  झाडे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी मानमोडी सरपंच मोहन पाटील, ऊपसरपंच विशाल इंगळे, पुंजाजी पाटील, अमोल व्यवहारे, बंटी पाटील, गजानन भोंडेकर, सोपान पाटील, प्रकाश पाटील, पराग घोरपडे, उमेश बिजागरे, निलेश जवरे, मासूम शेख ऊपस्थित होते.

 


Protected Content

Play sound