बोदवड प्रतिनिधी । आजवर कोरोनाच्या संसर्गाला थोपवून धरलेल्या बोदवड तालुक्यात आज कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व तालुके रेड झोनमध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून येत असतांना काही तालुक्यांमध्ये मात्र रूग्ण नव्हते. यात मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांचा समावेश होता. मुक्ताईनगरात काही दिवसांपासून रूग्ण आढळून येत असतांनाही बोदवडमध्ये रूग्ण न आढळल्याने हा तालुका जिल्ह्यातील एकमेव ग्रीन झोनचा तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र आज आलेल्या रिपोर्टमध्ये बोदवड तालुक्यात रूग्ण आढळून आल्याने हा लौकीक देखील नाहिसा झाला आहे. तर आता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचेही अधोरेखीत झाले आहे.