*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील बोढरे गावात जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आज प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे सहकारी शाळांसह खासगी शाळा ह्या बंद होत्या. दरम्यान सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून शाळेवरील कठोर निर्बंध हटविले असून शाळा महाविद्यालये उघडले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील बोढरे गावात जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आज प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडवून शाळेत येण्याबाबतचे आवाहन या प्रभात फेरीतून करण्यात आले आहे. सदर प्रभात फेरी हि शाळा पूर्व तयारी अभियानाअंतर्गत काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कोरोना गेला, पहिलीच्या मुला- मुलींना शाळेत पाठवा अशा विविध घोषणाबाजी केल्या. यामुळे काही क्षणांसाठी परिसर दणाणून गेला होता. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मनोज पाटील, पगारे, ब्राह्मणकार, अमृतकार, कापडणीस व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.