जळगाव, प्रतिनिधी । जिल्हातील काही शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पदभरती करण्यात आली होती या प्रकणांत तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पदभरती करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची विभागीय चौकशी करण्यात आली. सोमवारी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिक्षण आयुक्तालय शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहे. महाजन हे सध्या नाशिक महापालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी शाळेची पटसंख्या, शिक्षकांची पदमंजुरी याविषयी कोणतीही पडताळणी न करता शिक्षकांना सर्रास शालार्थ आयडी दिल्याच्या आरोपाखाली शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. विधिमंडळ अधिवेशनात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नितीन बच्छाव यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करत विधानसभेतही याप्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते.