बेवफा कौन..प्रेमाच्या त्रिकोणाचा तिढा ; पोलिसांची वाढली डोकेदुखी

 

रावेर , प्रतिनिधी । बेवफा कौन ?… एक प्रेमीका तर दोन प्रियकरांच्या अजब प्रेमत्रिकोणाचा निवाडा करण्याचे काम रावेर पोलिसांवर येऊन पडल्याने त्यांची डोकेदुखीत वाढली असून त्यांनी तूर्त मध्यममार्ग काढून प्रकरण मिटविले आहे.

एक प्रेमिका तर दोघा प्रियकरांचा निवाडा रावेर पोलिस स्टेशनला आला असता या तिघांमध्ये बेवफा कौन शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसां समोर होत. याची दिवसभर पोलिस स्टेशनच्या आवारात चर्चा होती.

बाजिराव-मस्तानी या चित्रपटातील किसकी तलवार पर सर रखूं ये बता दो मुझे..इश्क करना खता है…तो सजा दो मुझे..ही शायरी उस्मानाबादच्या युवतीवर परफेक्ट बसतेय.

आताचे मूल-मूली प्रेमासाठी काहीपण करायला तयार आहे. याचा प्रत्याय रावेर पोलिसांनी आज अनुभवला. घडले असं की, उमरगा (जि.उस्मानाबाद) येथील २० वर्षीय टीवायबीएचे शिक्षण झालेली युवती औरंगाबादच्या एका कंपनीत जॉब करत होती…जॉब करता-करता.. या युवतीचे तिच्या सोबतच जॉब करणारा आणि मुळचा औरंगाबादचा असणाऱ्या एका २२ वर्षीय युवका सोबत प्रेम संबध जुळले. अश्यातच रावेर तालुक्यातील एका खेड्यामधील २३ वर्षीय युवक टिक-टॉकवर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करायचा. ह्या युवकाचे व्हिडिओ आवडू लागल्याने ती त्याच्या प्रेमात पडली. यातून तिला आधीचा प्रियकर नकोसा वाटू लागला. तीने टिक-टॉकस्टारशी मोबाईलवर बोलणे सुरु केले. या बोलण्याचे प्रेमात रुपांतर होऊन दोघांनी बुर-हानपुर (मध्य प्रदेश ) येथे लग्न केले. त्यांच्या लग्नाला एक वर्ष उलट नाहीत तोच तिला आपल्या पहिल्या प्रियकराची आठवण येऊ लागल्याने तिने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. यातून त्यांचे प्रेम पुन्हा बहरले. पहिला प्रियकर तिला घेऊन जाण्यासाठी थेट रावेर तालुक्यातील तिच्या गावी येऊन धडकला. यातच तो मागील चार दिवसापासून प्रेयसीच्या गावाच्या घिरट्या घालत असून रात्री उड्डाणपूलावर झोप घेत आहे. तिच्या नवऱ्याला संशय आल्याने दोघांचे बिंग फुटले. प्रकरण पोलिसात गेल्यावर ती तरुणी आपल्या पहिल्या प्रेमासोबत जाण्यावर ठाम आहे तर तिचा नवरा आपण तुला कोणाच्या जबाबदारी सोडू असा प्रश्न उपस्थित करत आहे. यातून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. यातून मध्यममार्ग काढत पोलिसांनी त्या तरुणीला नवऱ्याकडे राहण्याचा सल्ला देत तरुणीच्या आई-वडिलांना बोलवून घेतले आहे. आता तरुणीचे आई-वडील आल्यावरच हा प्रेमाचा त्रिकोण सुटणार आहे.

Protected Content