यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव गावात राहणारा अकरा वर्षाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुने नेल्याची तक्रार मुलाच्या आई दिली असता पोलीसांनी त्या मुलाचा काही तासातच शोध लावुन आई वडिलांच्या स्वाधिन केले आहे.
यावल तालुक्यातील किनगाव गावात राहणाऱ्या व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या साबीर खान पठान यांचा नुर मोहम्मद नावाच्या ११ वर्ष वयाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची तक्रार सईदाबी खान यांनी १७ रोजी यावल पोलीस ठाण्यात दिली होती. मुलगा कुणी घेवुन गेले किंवा त्याचे काही बरे वाईट तर केले नाही ना, या दुविधा मन :स्थिती होती. खान कुटुंबास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तात्काळ दखल घेत वेगाने शोध घेत त्या ११ वर्षीय मुलाचा किनगाव परिसरातुन शोध लावण्यात यश मिळवले व त्या मुलास पालकाच्या स्वाधिन केले. दरम्यान अकरा वर्षीय मुलगा नुर मोहम्मद खान हा संतापाच्या भरात आपण आपल्या घरातुन निघुन गेल्याचे त्यांने सांगीतले. यावेळी आपल्या मुलाचा शोध घेण्यात पोलीस निरिक्षक सुनिल मोरे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल मुलाचे वडील साबीर खान व तिची आई सईदाबी खान यांनी आभार मानले .