जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशील गावठी हातभट्टीची दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील दारू व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कुसुंबा येथून बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करून शहरात आणत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. लोकरे यांनी स.फौ. अतुल वंजारी, स.फौ. आनंदसिंग पाटील, स.फौ. रामकृष्ण पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, पो.ना. मुदस्सर काझी, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. हेमंत कळसकर यांनी रेमंड चौफुलीवर कारवाई करत संशयित आरोपी भागवत गोविंदा महाजन (वय-६०) आणि प्रविण भागवत महाजन (वय-२८) दोन्ही रा. नागदुली ता. एरंडोल हे दुचाकी (एमएच १९ सीई ५७७०) पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात ३ हजार रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. तीन हजार रूपये किंमतीची दारून आणि दुचाकी असा एकुण ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरील कारवाई रात्री ८ वाजेच्या सुमारास केली आहे. याप्रकरणी पो.कॉ. चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.