जळगाव प्रतिनिधी । नवीपेठेतील दोन दुकानांवर बेकायदेशीरित्या वारस लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भूमापन अधिकाऱ्यांसह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील सीटी सर्व्हे नं. २११८/३२ या नवीपेठ येथील तळमजल्यातील दोन दुकाने मुकेश तुळशीराम टेकवाणी (वय-६१) रा. स्टेट बँक कॉलनी, आदर्श नगर, जळगाव यांनी सन १९९० मध्ये कायदेशीर रित्या रजीस्टर्ड खरेदीखताने खरेदी घेतली आहे. यात १४.२१ आणि २०.५३ चौरस मीटर प्रमाणे दोन दुकाने आहेत. दरम्यान किशोर अशोक पाटील यांचे आजोबा माधव फकिरा पाटील हे ८ डिसेबर २००१ रोजी मयत झाले आहे. त्यामुळे अशोक पाटील याने १४ जानेवार २०१९ रोजी भूमापन अधिकारी डी.आर.पाटील व परिक्षण भूमापण अधिकारी संजय सोनार यांना हातीशी घेवून चंद्रकांत अशोक पाटील, हिराबाई अशोक पाटील, रत्ना तुषार भोसले, निर्मलाबाई धनराज पाटील, मिनाक्षी संजय काकडे, सुरेखा प्रभाकर पाटील सर्व रा. गणेश कॉलनी जळगाव यांचे १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून बेकायदेशीर रित्या वारस लावले आहे. यासंदर्भात सहाय्यक पोलीस अधिक्षक व शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किशोर अशोक पाटील, भूमापन अधिकारी डी.आर.पाटील, परिक्षण भूमापण अधिकारी संजय सोनार, चंद्रकांत अशोक पाटील, हिराबाई अशोक पाटील, रत्ना तुषार भोसले, निर्मलाबाई धनराज पाटील, मिनाक्षी संजय काकडे, सुरेखा प्रभाकर पाटील सर्व रा. गणेश कॉलनी जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात बुधवारी १५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.