बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक; दोन तलवार व चाकू हस्तगत

भुसावळ प्रतिनिधी । बेकायदेशीर धारदार शस्त्र बाळगणाऱ्या संशयित आरोपीस भुसावळ पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील दोन तलवार व चाकू हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील गौसिया नगरात राहणारा संशयित आरोपी जमील उर्फ राजा तस्लीम शेख (वय-२३) याच्या घरात तलवार व चाकू असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिली भागवत यांच्या पथकातील सपोनि अनिल मोरे, पो.ना. रविंद्र बिऱ्हाडे, किशोर महाजन, रमन सुरळकर, पो.कॉ.कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, बंटी कापडणे, महिला पो.कॉ. वैशाली सोनवणे यांनी बुधवारी १० जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी जावून झाडाझडती घेतली असता घरातून दोन तलवार व दोन चाकू आढळून आले. दरम्यान संशयित आरोपी जमील शेख याला अटक करण्यात आले. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. किशोर महाजन करीत आहे.

Protected Content