जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने रासेयो स्वयंसेविकांसाठी उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉ. गौरी राणे होत्या. या कार्यक्रमात माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुजाता गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप, कार्य आणि महाविद्यालयीन जीवनात रासेयोचे महत्त्व याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच त्यांनी रासेयो मधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि सर्वांगीण विकास होत असतो, असे मत व्यक्त केले.
त्यानंतर दुसरे वक्ते माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थी स्वयंसेवकांचे सामाजिक संस्कार घडविणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे मत मांडले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी रासेयोत विद्यार्थ्यांची व कार्यक्रम अधिकारी यांची भूमिका आणि त्यांचे कार्य आणि समन्वय ह्या बाबी महत्वाच्या आहेत. तसेच रासेयो अंतर्गत येणारे विविध उपक्रम, योजना, शिबीर, कार्यक्रम यांची माहिती देऊन या सर्वांमधून विद्यार्थ्यांवर मूल्य संस्कार घडविले जातात, असे मत व्यक्त केले. महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेविका दीप्ती पाटील हिची शिवाजी विद्यापीठ येथे होणाऱ्या प्री एसआरडी शिबिरासाठी निवड झाली, त्याबद्दल प्राचार्य राणे याच्याकडून व रासेयो एकाकामार्फत तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रासेयो गीत “उठे समाज के लिए उठे उठे। जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे।। गायनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका सहारा पठाण व याचना काळे यांनी, प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल बेलसरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दिपक किनगे यांनी केले. या कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. एस. बी. पाटील, प्रा. बी. के. साखळे, प्रा. जे.डी. मोरे आणि रासेयो स्वयंसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शीला राजपूत, प्रा. रत्नप्रभा महाजन, प्रा. शुभांगी चौधरी यांनी प्रयत्न केले.