बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बुलढाण्यातून कौतुकास्पद बातमी समोर आलीय. एका अधिकाऱ्याने दाखवलेल्या मनाचे मोठ्या पणामुळे एका कर्मचाऱ्याला अधिकारी बनवण्याचे स्वप्न पूर्ण झाले. दरम्यान, सरकारी अधिकारी म्हटलं तर त्याचा रुबाब अन् थाट काही वेगळाच असतोय. त्यामुळ बुलढाण्यातील महावितरण कंपनीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला देखील अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. मात्र ते काही कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाहिये, अन् कर्मचारी झाला. परंतू आपल्या वरिष्ठ अधिकाराने दाखवलेल्या मनाचा मोठेपणामूळ ते स्वप्न आता सहज शक्य झालं. ४० वर्षातील सेवेत अखेरच्या दिवशी त्या कर्मचाऱ्याला अधिकारी होण्याचा सन्मान मिळाला.
खामगाव येथील रोजंदारी ते महावितरणमध्ये कायम होऊन लाईनमन म्हणून आपली सेवा देणारे ब्रिज मोहन मातादीन यादव नामक कर्मचाऱ्याचा काल निरोप समारंभ थाटात पार पडलाय. दरम्यान, या निरोप समारंभात काल काही वेगळं पाहायला मिळाले, काल ३० नोव्हेंबरला जवळपास ४० वर्ष पासून सेवा देणाऱ्या ब्रिज मोहन यादव यांना एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे सन्मान देण्यात आलाय. निरोप समारंभावेळी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या महावितरणाच्या अधिकाऱ्याच्या वाहनात अधिकाऱ्यांच्या स्थानावर बसवण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांचा अख्ख कुटुंब या वाहनात बसवले. अन खामगाव शहरातून एक चक्कर मारलाय. चाळीस वर्षे सेवेत सुरुवातीला सायकल आणि नंतर दुचाकी असा प्रवास झाला. आता अखेरच्या दिवशी एखाद्या अधिकार्याप्रमाणे वाहनात बसून प्रवास झाल्याने अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, असं म्हणत यादव यांनी महावितरणातून निरोप घेतलाय. यावेळी अधिकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे डोळे भरून आले होते. हे आनंदाचे क्षण पाहण्यासाठी महावितनातील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असा आहेय रोजंदारी ते महावितरण प्रवास-
१९८२ मध्ये अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी अंशकालीन कर्मचारी म्हणून रोजंदारी स्वरूपात वीज वितरण तेव्हाचे ‘एमएसईबी’मध्ये रुजू झाले, आता बघता बघता ४० वर्ष लाईनमन पदाची सेवा दिल्यानंतर काल निवृत्ती सोहळा पार पडला. दरम्यान निवृत्तीच्या दिवशी देखील परिसरातील वीज वितरणचे ग्राहकांकडे असलेली थकबाकी करून आणली, तर आपल्या रोजंदारी ते लाईनमन म्हणून विना अपघात, ना कुठले गालबोट अशी संपूर्ण ४० वर्ष सेवा दिली. म्हणून संपूर्ण अधिकारी कर्मचारी वर्गाच्या वतीनं ब्रिज मोहन यांचा मोठा सत्कार झाला. अशी काही क्षण नेहमी अनुवाद येत नाही. पण आपण आपल्या कामाबद्दल सेवा देत राहिलो तर अधिकारी देखील त्याची कुठेतरी दखल घेत असतात असं म्हणायला हरकत नाहीये. कारण सेवेतील अखेर दिवशी संपुर्ण कुटुंबाला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या मनाचा मोठेपणा आणि कर्मचाऱ्याबद्दल दाखवल्या आदर बद्दल सर्वत्र कौतुक आणि चर्चा होत आहे. सध्या याचा व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल होत आहे.