बुलढाणा विशेष रिपोर्ट : आमचं गाव विकत घ्या !

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनेक वेळा शासन दरबारी मृत्यूची परवानगी, अवयव दान करून गावातील सामाजिक कार्य-उपक्रम, करण्याची परवानगी असे किस्से समोर येतात. यातच सातत्याची अतिवृष्टी आणि राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी हे गावच विक्रीला काढल्याचं ग्रामस्थांनी जाहीर केलं आहे. पण एखाद संपूर्ण गावच विकण्याकरता गावकरी ठराव घेता तर याला काय म्हणावे. काय आहे.. संपूर्ण हकीकत जाणून घेऊया.

ढग फुटी नंतर पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांच्या जमीन खरडून गेल्या. पंचनामे झाले मात्र अद्यापि नुकसान भरपाई मिळाली नाही. तलावाची दुरुस्ती झाली नाही. शेतकऱ्यांवरील संकट दूर झाले नाही म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढलाय. 28 जून रोजी ढगफुटी होऊन आमखेड आणि अंबाशी येथे पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांच्या जमीन करून गेल्या आहेत . विहीर खचून गाळामध्ये दाबल्या गेल्या. या घटनेनंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पाहणी करून पंचनामे देखील झाली .या नुकसान भरपाई तसेच तलाव पूर्ववत करून मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र ही सारी सपने भंगल्याने अंबाशी ग्रामस्थांनी गाव विक्रीस काढले .या अनुषंगाने ग्रामपंचायतीचा ठराव देखील घेण्यात आला असून गावाच्या प्रवेशद्वारावरच गाव विकणे आहे असा फलक लावण्यात आला आहे.

सरपंच गायकवाड यांच्या उपस्थितीत 29 नोव्हेंबरला पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा ठराव घेण्यात आला आहे. शासन प्रशासनाचे गावातील शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने हडबळते तून निर्णय आम्ही घेतला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अतिवृष्टीने 2019 पासून तब्बल 757 शेतकऱ्यांच्या विहिरी खचले आहेत .त्याचे पंचनामे देखील झाले आहेत. मात्र पुढील त्याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. या विहीर तशाच पडून आहेत. विहिरीतील गाळ दगड माती काढण्यासह बांधकाम करण्यासाठी किमान तीन ते चार लाख रुपये खर्च आहे. तो करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाही.
एकंदरी कधी गावाच्या विकासासाठी तर खचून गेलेला शेतकरी आपली जीवाची परवा न करता अवयव दान करून शासनाकडे त्याच्या दरबारात विनवण्या मागणी करतो पण आता चक्क गाव विकायला काढून गावातील विकास साधण्याकरता हा एक अभिनव किस्सा समोर येत आहे. याची सर्वत्र जिल्ह्यात चर्चा होत आहे. आता तरी या गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होता का याकडे लक्ष लागले आहे.

 

Protected Content