*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ घडलेल्या भिषण अपघातात चाळीसगाव तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची थरारक घटना आज सकाळी पहाटे घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ अल्टो कार व लक्झरी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भिषण अपघातात कारमध्ये बसलेल्या चाळीसगाव तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने चाळीसगाव तालुका सुन्न झाला असून चाळीसगावकडे येत असताना हा विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात इंदल चव्हाण (वय- 38 रा. सांगवी ता. चाळीसगाव), योगेश विसपुते (वय-३२ रा. चाळीसगाव), विशाल विसपुते (वय-३८ रा. चाळीसगाव) यांचा बळी गेला आहे. तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृतांमध्ये योगेश विसपुते व विशाल विसपुते हे संख्ये भावंडे होते. जखमींना उपघाराकामी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तत्पूर्वी अपघात हा एवढा विचित्र होता की, कार हि लक्झरीत अडकून गेली. व कारमधील मृत व जखमींना बाहेर काढणे खूप कठीण झाले होते.