बुलडाणा, प्रतिनिधी : बुलडाणा आगाराच्या भंगार बसेस प्रवाशांच्या जिवावर उठल्याचे अस्वस्थ चित्र आहे. यातच आज सकाळी स्टेरींगचा रॉड तूटल्याने अपघात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही
बुलढाणा आगाराची बुलडाणा- सैलानी ही बस सैलानीकडे आज पहाटे ६.४५ च्या सुमारास निघाली असता, या बसचा स्टेरींगचा रॉड अचानक तूटल्याने सागवन पूलाजवळ अपघात घडला. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. बसचे चालक, वाहक व ५ ते ६ प्रवासी सुखरूप आहेत. बस मात्र क्षतिग्रस्त झाली आहे. जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या बसेसचे ब्रेकडाऊन होणे, रॉड तुटणे अशामुळे अपघाताच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. गाड्या खिळखिळ झाल्याने हे अपघात होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी एसटी बसमध्ये बदल करावेत अशी मागणी केली आहे.