धरणगाव (प्रतिनिधी) बुद्धांचा धम्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुता ,ज्ञान,विज्ञान,क्षमा,शांंती यावर आधारित असून बुद्धांच्या अष्टांगमार्गातच समाजाचे हित आहे, हा धम्मच माणसाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणारा आहे असे प्रतिपादन भदन्त धम्मरक्षित महाथेरो(सुरत) यांनी धरणगाव येथे झालेल्या प्रथम नागवंशी धम्म परिषदेत केले.
अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने गौतम नगर येथे आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष दीपक आनंदा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भन्ते नागसेन हे होते. प्रास्ताविक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले, त्यांनी धम्मपरिषद भरविण्यासंबंधी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तर सूत्रसंचलन नाना बागूल यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ,नगराध्यक्ष निलेश चौधरी, भानुदास विसावे, डॉ. लिलाधर बोरसे, नगरसेवक विनय भावे, बापू पारेराव, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, अरविंद मानकरी यांनी आपल्या भाषणातून परिषदेला शुभेच्छा दिल्या. भदन्त धम्मरक्षित महाथेरो, भदन्त गुणरत्न महाथेरो (नंदुरबार),भदन्त महानाम थेरो (यावल), भदन्त महामोगल्यान थेरो (नागपूर) आणि भन्ते नागसेन यांनी उपासकांना धम्मदेसना सांगितली.
वाघमारेंचा विशेष सत्कार
धम्मपरिषदेचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल दिपक वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने उपस्थित उपासकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि धम्म ‘ या ग्रंथाच्या प्रती वितरित करण्यात आल्या.
सकाळी भव्य धम्म रॅली
धम्म परिषदेच्या निमित्ताने सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य रॅली काढण्यात आली.या रॅलीत बौध्द बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. धम्मपरिषदेला डॉ. मिलिंद बागूल, प्रा. यशवंत मोरे, दिलीप सपकाळे, शरदकुमार बन्सी, धर्मराज मोरे, बी. डी. शिरसाठ, रवी महाजन, राजेंद्र बागूल, गोवर्धन सोनवणे, राजेश बोरसे यांची उपस्थिती होती.