जळगाव, प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बीएड सीईटी परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन कार्यशाळा आयोजन करण्यात आले.
बीएड सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन कार्यशाळेत १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या कार्यशाळेत मानसिक क्षमता, सामान्य ज्ञान आणि शिक्षक अभियोग्यता तसेच प्रवेश प्रक्रिया कार्यपद्धती या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील आय क्यू ए सी विभागाने केले होते. या कार्यशाळेत प्राचार्य अशोक राणे, डॉ. शैलजा बंगाळे, डॉ.रंजना सोनवणे, डॉ. कुंदा बाविस्कर या प्राध्यापकांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. बी.एड. सीईटी प्रवेश परीक्षा अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत अशी माहिती प्राचार्यांनी दिली.