बीडमध्ये आईसह दोन मुलांची निर्घृण हत्या !

बीड (वृत्तसंस्था) आईसह दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बीडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. संगीता संतोष कोकणे आणि तिची दोन मुलं यांचा खून करण्यात आला आहे. दरम्यान संशयित म्हणून महिलेचा पती संतोष कोकणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

बीड शहरातील शुक्रवार पेठ भागात रविवारी (24 मे) भर दुपारी घडली. आई आणि एका मुलाला दगडांनी ठेचून त्यांची हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या मुलाला पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून मारण्यात आले. संगीता संतोष कोकणे (वय-31), संदेश संतोष कोकणे (अंदाजे वय-10) या दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. तर मयूर संतोष कोकणे (वय-7) याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून घरात कौटुंबिक वाद सुरु होते. मात्र, या माय लेकांचा खून का झाला? यामागील कारण समजून आले नाही.

Protected Content