नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात अनेक कंपन्यांनी कामगार कपात केली आहे. आता बीएसएनएल सरकारी कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. धक्कादायक म्हणजे ही संख्या २० हजारच्या घरात आहे.
या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही. याआधी बीएसएनएलने ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. बीएसएनएल कर्मचारी संघाचे अध्यक्ष व्ही के पुरवार यांना पाठवलेल्या पत्रात कंपनीच्या या परिस्थितीला स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
जेव्हा ही योजना अमलात आली तेव्हा कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली. आता कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचारी नसल्याची स्थिती आहे. यामुळे नेटवर्क फॉल्ट वाढला आहे.
त्यांना गेल्या १४ महिन्यापासून पगार दिला नाही. यामुळे १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. स्वेच्छा निवृत्ती योजना अंमलात आल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना नियमीत वेळेत पगार दिला जात नाही.