बिहार सरकारचा ‘दि एंड’ : नितीश कुमारांचा राजीनामा

पाटणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | एकीकडे महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार होत असतांना दुसरीकडे बिहारमध्ये राजकीय भूकंप होऊन सरकार कोसळले आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने आता घडामोडी वेगवान झाल्या आहेत.

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. याद्वारे त्यांनी भाजपची साथ सोडल्यावर शिक्कामोर्तब झालंय. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार हे राजदच्या नेत्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. याठिकाणी बैठकीनंतर राजदसोबत नवं सरकार स्थापण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडण्यापूर्वी नितीश कुमार यांनी आपल्या सर्व आमदारांसोबत एक बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती समजत आहे.

Protected Content