बिस्मिल्ला चौकात बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविला

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील बिस्मिल्ला चौक येथील एका मजुराचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सोमवारी १९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मज्जिद शहा हसनशहा फकीर व 51 राहणार बिस्मिल्ला चौक तांबापुर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे मॉल मजुरी करून आपला ते उदरनिर्वाह करतात. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत आज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ६८ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मज्जिद शहा हसीन शहा फकीर हे घरी आल्यावर त्यांच्या घराचे कुलूप तोडून फेकलेले दिसून आले. घरात गेल्यावर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Protected Content