बिल मागण्यावरून हॉटेल चालकासह वेटरला मारहाण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभात चौकात असलेल्या हॉटेल मोहनिश येथे असलेल्या दारू पिल्यानंतर बिल मागितल्याच्या कारणावरून पाच जणांनी हॉटेल चालकासह वेटरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हॉटेलमधील सामानांचे नुकसान केल्याची घटना  घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंद पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हर्षल राजेंद्र बारी (वय-२८) रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव हा तरुण परिवारासह वास्तव्याला असून प्रभात चौकात हॉटेल मोहनिश नावाच्या नावाचे हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हर्षल बारी यांच्या हॉटेलवर पिंटू कोळी याच्यासोबत अनोळखी ४ जण दारू प्यायला बसले, दारू पिल्यानंतर बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल चालक हर्षल राजेंद्र बारी व वेटर यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच हॉटेलमधील बाटल्या, टेबल, खुर्च्या यांची नासधूस केली तसेच दगड व विटा काउंटर फेकून नुकसान केले आहे. या संदर्भात हर्षल बारी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी पिंटू कोळीसह इतर अनोळखी चार जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Protected Content