ठाणे (वृत्तसंस्था) संगनमत करुन जमिनीची कागदपत्रे तयार करून त्याच कागदपत्रांच्या आधारे ठाणे महापालिकेत अर्ज करून बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी महापालिकेतील भाजपचे गटनेते नारायण पवार यांना अटक करण्यात आली आहे.
भाजपचे गटनेते नारायण पवार यांच्यासोबत एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत म्हटले होते की, आरोपींनी संगनमत करुन जमिनीची कागदपत्रे तयार केली आणि याच कागदपत्रांच्या आधारे ठाणे महापालिकेत अर्ज करून बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागितली. तसेच, तीन लाख रुपये स्वीकारले असल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.