जळगाव प्रतिनिधी । चोपडा येथील ज्येष्ठ पत्रकार लतीश जैन यांच्या अर्धांगिनी त्रिशला जैन यांनी बिलोरी स्तवन (भजन) स्पर्धेत भाग घेतला असून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चोपडा येथील ज्येष्ठ पत्रकार लतीश जैन यांच्या पत्नी त्रिशला जैन यांनी बिलोरी स्तवन (भजन) स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धेत त्या नाशिक विभागातून सहभागी झालेल्या आहेत. यात त्यांनी म्हटलेले स्तवन हे भाविकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांचा व्हिडीओ पाहून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांना मतदान करावे. या मतदानाच्या मदतीनेच त्या या स्पर्धेत विजयी होऊन चोपडा व जळगाव जिल्ह्याचा लौकीक वाढवू शकतात. यामुळे सर्वांनी त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदानासाठीची लिंक : https://bit.ly/2NG3mYb