जळगाव प्रतिनिधी । मजुरीच्या पैशांच्या कारणावरून बिलाल चौकात सात ते आठ जणांनी अकरम इस्माईल खाटीक यांच्यासह तीन जणांवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी शेख जुनेद शेख युनूस (२१), मोहम्मद शोएब उर्फ रफत शेख सलीम (१९), रिजवान खान अहमद खान (२०), जाफर खान इकबाल खान (२३, सर्व रा़ तांबपुरा) या संशयिताना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २७ जानेवारी रोजी बिलाल चौकात अरबाज खाटीक, जुनेद शेख, जाफर खान, रिजवान खान, मोहम्मद शोएब, बाबा अकरम अहमद खान यांच्यासह दोन ते तीन जणांनी मजुरीच्या पैशांच्या कारणावरून अकरम खाटीक यांना मारहाण केली होती. त्यातील एकाने त्यांच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले होते. तर अकरम यांचे मित्र अशरफ शेख शकील, फैजान आसीब खान यांना देखील मारहाण करण्यात आली. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी अकरम हिची बहिण शाहिन ही आल्यावर तिच्या हातावर देखील चाकूने वार करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात ८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील काही संशयित हे तांबापूरा आणि सुप्रिम कॉलीत राहत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळान्यानंतर पोलीस निरिक्षक रणजित शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप हजारे, स.फौ. अतुज वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, राजेंद्र कांडेलकर, नितीन पाटील, आसीम तडवी आदींच्या पथकाने तांबापूरा व सुप्रिम कॉलनीतून शेख जुनेद शेख युनूस, मोहम्मद शोएब उर्फ रफत शेख सलीम, रिजवान खान अहमद खान, जाफर खान इकबाल खान या चौघांना अटक केली आहे.