बिबट्याची शेतकर्‍यावर झडप; टाकळी शिवारातील थरारक घटना

बुलडाणा प्रतिनिधी । अंत्री बोराखेडा गावातील टाकळी शिवारात आज सकाळी ७ वाजता शेतकरी शेतात जात असतांना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर झडप घातली. या थरारक घटनेत झालेल्या झटापटीत शेतकरी जखमी झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, शेतकरी गजानन जगदेव नागोलकर हे आज सकाळी त्यांच्या टाळकी शिवारातील शेतात जात असतांना शेतातील धूऱ्यावर एका नाल्यात ४० ते ५० फुट खोल अशी धव अर्थात गुफेसारखी पोकळी आहे. यामध्ये बिबट्या आपल्या बछड्यासोबत राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गजानन नागोलकर जात असतांना त्यांचेवर बिबट्याने अचानक झडप घालून गंभीर जखमी केले. त्यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी मोठ्या हिंमतीने बिबट्याशी दोन हात केले परंतू ते स्वतः जखमी झाले असून बुलडाणा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

Protected Content