बावनकुळे यांच्या दौऱ्याची पूर्वतयारी ; महानगर भाजयुमोची बैठक

 

जळगाव :  प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश प्रभारी चंद्रशेखर  बावनकुळे  व प्रदेशाध्यक्ष  विक्रांत पाटील यांचा उत्तर महाराष्ट्र विभागीय दौरा पूर्वतयारी निमित्ताने महानगर जिल्हा कार्यकारिणी बैठक  जिल्हा भाजयुमो प्रभारी किरण बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 

यावेळी आ. सुरेश भोळे व भाजपा   महानगराध्यक्ष दिपक  सूर्यवंशी यांनी नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले

प्रदेश प्रभारी किरण बोराडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व  अन्य  महत्वपुर्ण विषयावर युवा कार्यकर्त्यांना सुचना केल्या.

या बैठकीस युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आंनद सपकाळे, जिल्हा सरचिटणीस   अक्षय जेजूरकर , मिलिंद चौधरी, महेश पाटिल, भा.ज.यु.मो  पदाधिकारी गणेश महाजन, सचिन बविस्कर, राहुल लोखंडे, आश्विण सेंदाणे, जयंत चव्हाण, सागर जाधव, अबोलि पाटील, भुषण जाधव, पुष्पेंद्र जोशी, प्रतिक  सेठ ,  मंडल अध्यक्ष दिनेश पुरोहित, महेश राठी, सागर पोळ, हर्शल चौधरि, निखिल सूर्यवंशी आदी  कार्यकर्ते उपस्थित होते

 

Protected Content