बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त युवसेनेतर्फे शहरात गोसेवा

 

जळगाव, प्रतिनिधी । हिंदू हृद्य सम्राट आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच गोसेवक, शाकाहार प्रणेते रतनलाल बाफना यांना श्रद्धांजली म्हणून शहरात मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी पांजरपोळ येथील गो शाळेत युवासेनेतर्फे गो सेवा करण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यामध्ये ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. तसेच गोरगरीब, वंचित लोकांची निस्वार्थपणे सेवा करण्याची शिकवण व प्रेरणा दिली आहे. याच जनसेवेसह, पशुसेवा देखील महत्वाची आहे. मुक्या प्राण्यांना जीव असतो. त्यामुळे मुक्याप्राण्यांची सेवा करावी हा देखील महत्वाचा संदेश बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे. त्यामुळे मंगळवारी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त पांजरपोळ गो शाळेत गाईंना लापशी व चारा खाऊ घालण्याचा स्तुत्य उपक्रम युवासेनेने घेतला.

गोसेवा केल्यानंतर तेथे गोमातेची पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी युवासेनेचे उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी, अशोक मोरे, ललित आमोदकर, रोहित शिरसाठ,गिरीश पाटील, सागर ढाके,चेतन चौधरी, महेश ठाकुर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content