यावल, प्रतिनिधी । इयत्ता 5वी ते 8वी च्या बालवैज्ञानिकांसाठी मनोरंजक, बौद्धिक आणि गुणवत्तावर्धक उपक्रम अनुभूती मूलभूत विज्ञान आणि सौर ऊर्जा केंद्र, डोंबिवली यांचे वतीने रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी अनुभूती या आनंददायी उपक्रमाचे मोफत ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे .
इयत्ता 5वी ते 8वी च्या विध्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि कृतिशीलता विकसित करण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न मूलभूत विज्ञान आणि सौर ऊर्जा केंद्र करत आहे. मुलांमध्ये ठोस दर्जेदार शिक्षण घेण्याची क्षमता निर्माण करायची असेल तर त्यांना स्वअनुभवातून शिकता यायला हवे. खेळणी, नवनिर्मिती , प्रयोग यातूनच त्यांचा विकास शक्य आहे. शिवाय वापरा आणि फेका संस्कृतीत न ढकलता कचरा ही संपत्ती आहे हे मुलांना समजावून देणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचे मूल्यवर्धन किती छान होऊ शकते याची जाणीव मुलांना होईल. विविध प्रकारची खेळणी तयार करण्यासाठी आणि त्यांचा अभ्यासक्रमात कसा उपयोग होतो हे समजून घेण्यासाठी ‘अनुभूती’ या आनंददायी कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यासाठी नाव नोंदवणे आवश्यक असून अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्र. अभय यावलकर 9892739798, 8422972628 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.