बालगृहात बालकांना पादत्राणे भेट देऊन वाढदिवस साजरा

एरंडोल, प्रतिनिधी  ।  सामाजिक कार्यकर्ते हितेश्वर मोतिरामाणी यांनी बालगृहात पादत्राणे भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.

 

हितेश्वर मोतिरामाणी यांचा वाढदिवसानिमित्ताने पर्यावरण संतुलनासाठी आणि संस्था परिसरात निसर्गरम्य वातावरण तयार होण्यासाठी विविध प्रकारचे दहा झाडांचे वृक्षारोपण केले. बालकांना अत्याश्यक लागणारे पादत्राणे भेट दिली,आवडती बिस्किटे, फरसाण, चॉकलेट, केक वाटप केले. मुलांसमवेत वाढदिवस साजरा  केल्यामुळे  फारच आत्मिक समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेतील बालकांनी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने   शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब इस्टचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य तसेच नेत्रा मोतिरामाणी, हेमवती मोतीरामाणी, रेखा हुंदानी,पल्लवी बोरसे, संजय भावसार, जितीन जानी, पराग भवर, विपुल पांड्या उपस्थित होते. संस्थाचालक प्रभाकर पाटील यांनी वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे आणि बालकांसाठी मोलाची मदत केल्यामुळे  मनस्वी आभार मानले. यशस्वीतेसाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे ,गणेश पंडीत,अरूणा पंडीत यांनी कामकाज पहिले. 

 

Protected Content