Home राजकीय बारामती जिंकण्याचे दिवास्वप्न पाहू नका- अजित पवार

बारामती जिंकण्याचे दिवास्वप्न पाहू नका- अजित पवार

0
52

जळगाव प्रतिनिधी । गिरीश महाजन यांनी बारामती जिंकण्याचे दिवास्वप्न पाहू नये असा इशारा देतांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क यात्रेनिमित्त आज सायंकाळी शहरातील मणियार मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले. यात राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अलीकडेच बारामतीतदेखील जिंकून दाखविण्याचे वक्तव्य केले होते. याचा अजित पवार यांनी कडाडून समाचार घेतला. या वेळी शहरात झालेल्या सभेच्या व्यासपीठावर माजी मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फाैजिया खान, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जयदेव गायकवाड, गफ्फार मलिक, ईश्वर बाळबुधे व पदाधिकारी उपस्थित हाेते. सर्वांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना गाेंजारण्याचा प्रयत्न केला, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. अजित पवार यांनी मंत्री महाजनांचा खास शैलीत समाचार घेतला.

हिटलर, सद्दाम हुसेन आदी हुकुमशहांनाही जग जिंकता आले नाही. यामुळे तुम्ही बारामती जिंकण्याचे दिवास्वप्न पाहू नका असा इशारा त्यांनी गिरीश महाजन यांना दिला. महाजन यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बारामतीतून लढून दाखवावे असे प्रति आव्हानदेखील त्यांनी दिले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनीही भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound