वाशिंग्टन : वृत्तसंस्था । बायडेन यांचा विजय झाल्यास ते भारतासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. याचे कारण म्हणजे बायडेन यांचं कलम ३७० ला समर्थन असून ते पुन्हा काश्मीरमध्ये लागू करावे अशी मागणी त्यांच्या निवडणूक प्रचारादमरम्यानही झाली होती
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक खूपच चुरसीची झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. बायडेन यांचा या निवडणुकीमध्ये विजय होणार असं निश्चित मानलं जात आहे. दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु असून बायडेन हे विजयापासून अवघ्या काही मतांनी दूर आहेत.. त्यामुळेच पाकिस्तानप्रेमी बायडेन राष्ट्राध्यक्ष होणे भारताची चिंता वाढवणारं ठरु शकतं
बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही काश्मीर विषयावरुन भारताच्या भूमिकेविरोधात भाष्य केलं आहे. मुस्लीम अमेरिकन लोकांना आकर्षित करण्यासाठी बायडेन यांच्या निवडणूक प्रचारातील वेगवेगळ्या गटांनी काश्मीरमधील मुस्लिमांची तुलाना बांगलादेशमधील रोहिंग्या आणि चीनमधील उइगर मुस्लिमांशी केली होती.
मुस्लीम मतांसाठी बायडेन यांच्या टीमने भारताने रद्द केलेलं कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भातही भाष्य करण्यात आलं होतं. बायडन यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यासुद्धा काश्मीर विषयासंदर्भात अमेरिकेने दखल घेतली पाहिजे अशा संदर्भातील वक्तव्य करताना दिसल्या. पाकिस्तानकडूनही अनेकदा काश्मीर प्रश्नी अमेरिकेने लक्ष द्यावे अशी विनंती अमेरिकेकडे करण्यात आलीय.
बायडेन यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याने पाकिस्तानलाही आता अमेरिकेबरोबरच संबंध सुधारण्याची आशा वाटू लागली आहे. पाकिस्तानला अमेरिकेने आर्थिक मदत करायला हवी असं मत असणाऱ्या मोजक्या अमेरिकन नेत्यांमध्ये बायडेन यांचा समावेश होतो.