अमळनेर येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने नटराज पूजा

 

अमळनेर, प्रतिनिधी । मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने अमळनेरातील रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शहरातील कलावंत तसेच माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी विद्या गायकवाड, नगरपालिका अधिकारी संजय चौधरी यांना छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आमंत्रित करून नटराजाची पूजन करून कलाकारांचा संवाद घडवून आणला.

याप्रसंगी पुन्हा एकदा शहरातील विविध क्षेत्रातले कलाकार उदाहरणार्थ अभिनय क्षेत्रातील संगीत-नृत्य लेखन दिग्दर्शन मिमिक्री आर्टिस्ट यांच्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन नगरपालिका क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी यांना धन्यवाद देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने कलावंतांच्या बेरोजगारीचा विचार करून या दिनाचं औचित्य साधून नाट्यगृह व सिनेमागृह खुली करण्याचा निर्णय घेतला त्याचा आनंद व्यक्त डी. ये. धनगर, नयना कुलकर्णी, मोहिनी जोशी, हर्षवर्धन पाटील, स्वप्निल चौधरी, सागर चावरिया, गौरव पवार यांच्यासह काव्यप्रेमी मंडळींनी उपस्थिती देऊन नटराजासन नमन केले तर आभारातून रंगभूमी दिनाची सकारात्मक सांगता करण्यात आली.

Protected Content