जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज नवीन २३८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात विशेष म्हणजे जळगाव शहरासह चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधित रूग्ण संख्या ५ हजार ९६२ एवढी झाली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २३८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ८३ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल चोपडा-३२, मुक्ताईनगर- ३१ असे रूग्ण आढळून आले आहे. तर अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-७, भुसावळ-६, अमळनेर-६, भडगाव-८, धरणगाव-१५, यावल-१०, एरंडोल-४, जामनेर -१२, रावेर -१३, पारोळा-२, चाळीसगाव ९ अशी रूग्ण संख्या आजचे तालुकानिहाय आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे
जळगाव शहर-१४२०, जळगाव ग्रामीणी- २६१, भुसावळ-५५५, अमळनेर-४५९, चोपडा-३९६, पाचोरा-१३०, भडगाव-२७३, धरणगाव-२५९, यावल-३१७, एरंडोल-२८१, जामनेर-३३५, रावेर-४३०, पारोळा-३१५, चाळीसगाव-१५२, मुक्ताइनगर-१७८, बोदवड-१८४, अन्य जिल्हा-१७ अशी रूग्णांची आकडेवारी आहेत.
दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५९६२ इतका झालेला आहे. यातील ३५४२ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१४५२; कोविड हॉस्पीटलमध्ये-१३२ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ४६९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८ मृत्यू झाले असून आजवरील एकुण मृतांची संख्या ३२९ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.