चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील घाडवेल येथील वीज वितरण कंपनीच्या एका ग्राहकाला वाढीव वीज बिल आल्याने महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. वाढीव वीज बिल कमी करून मिळावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकाने दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील उत्तम खंडू कोळी वय ७५ यांनी १६ ऑक्टोंबर २०१५ मध्ये महावितरण कंपनीचे विजेचे कनेक्शन घेतले. कनेक्शन घेतल्यापासून २ वर्षांपर्यंत वीजेची आकारणी केली नाही. २५ व्या महिन्यात एकदम ४१ हजार ३२० रूपयांचे वीज बिल पाठवून भोंगळ कारभाराचा नमूना दिला. पुढील दोन महिन्यांपर्यंत कोळी हे महावितरण कार्यालयात जावून अनेक चकरा मरल्या मात्र काहीच उपयोग झाला नाही. वीज बिल भरले नाही म्हणून त्यांचे वीजचे बिल कट केले. दरम्यान दोन वर्षाचे जे काही सरासरी रक्कम असेल ते भरण्याची तयारी कोळी यांनी दर्शविली असतांना देखील महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. बसविलेले फॉल्टी मिटर बसून अवाजवी बिल आले आहे असा आरोप कोळी यांनी केला आहे. दरम्यान वीज बिल कमी न झाल्यास आमरण उपोषणाचा किसान सभेत तर्फे करण्यात येईल असा इशारा सल्लागार कामगार नेते यांनी दिला आहे.