भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील बाजारपेठ जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशनुसार ३१ मार्चपर्यत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून बाजारपेठ मधील काही दुकाने सुरू असल्याने भुसावळ नगरपरिषदचे अधिकारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करीत आहे.
जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दि. १६ मार्च रोजी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश ३१ मार्च पर्यत लागू केले आहे. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यास भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून त्याचे विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. यासाठी भुसावळ नगरपरिषदेचे अधिकारी शहरात फिरत असून दुकानदारांना बंद करण्याच्या सूचना देत आहे. या व्यतिरिक्त जर कोणी कायद्यांचे उल्लंघन केल्यास त्यास ५००० रुपये दंड होण्याची शक्यता आहे. आद्यपावतो कुठल्याही व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेले नसल्याची माहिती न.पा.अधिकारी महेश चौधरी यांनी दिली.