बांबरुड (राणीचे) येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी |  तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथे ३८ वर्षीय हातमजुराने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बांबरुड (राणीचे) येथील दत्तात्रय मधुकर पाटील (वय – ३८) या हातमजुराने २४ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. दत्तात्रय पाटील यांनी हे टोकाचे पाऊल उचलले त्यावेळी परिवारातील सर्व सदस्य हे गावात असलेल्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. दत्तात्रय पाटील यांनी आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केली असावी ? अशी चर्चा गावात सुरू होती. मयत दत्तात्रय पाटील यांचे पाश्चात्य आई, वडिल, पत्नी, दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहे

 

Protected Content