बांबरुड (राणीचे) येथे आषाढी एकादशी निमित्त मोफत तपासणी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथे आषाढी एकादशी निमित्ताने  आयुर्वेद व पंचकर्माचे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिराचा २५० गावकऱ्यांनी लाभ घेतला.

 

आयुर्वेद व पंचकर्म शिबिराचा प्रारंभ  मुख्याध्यापक दिलीप महाले यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्ताने  विठ्ठल रुक्मिणींची आरती, दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी गावातील सर्व भजनी मंडळींचा सत्कार करण्यात आला. गावाकडे पंचकर्म हा विषय नवीन होता. परंतु, आता ग्रामीण भागात देखील डॉ. हर्षल महाले व डॉ. प्राजक्ता महाले यांच्या नवजीवन हॉस्पिटलतर्फे आयुर्वेद व पंचकर्माचा उपचार मिळणार आहे.  पंचक्रोशीतील गावकऱ्यांनमध्ये शिबिराबद्दल उत्साहाचे वातावरण दिसून आले. या मोफत तपासणी शिबिरात तब्बल २५० नागरिकांची मोफत तपासणी व मोफत औषधे वाटप करण्यात आली. या शिबिरास बचत गटाच्या कोमल जावळे व अनिता भदाणे यांचे सहकार्य लाभले.  या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content