जळगाव प्रतिनिधी । पोलीस मुख्यालयातील नवीन क्वार्टसचे बांधकामाच्या ठिकाणाहून दीड लाख रूपये किंमतीच्या वस्तू तेथीच कामागारांनी कामगारांनी काहीही न सांगता घेवून गेल्याने बांधकामावर मोठे नुकसान होत आहे. याप्रकरणी तिघा मजूरांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव पोलीस मुख्यालयात २५२ क्वार्टर व आपीआय ऑफिसच्या बांधकाम सुरू आहे. गेल्या १ वर्षांपासून सतीष रामदास परदेशी (वय-६०) रा. हे प्रोजेक्ट इंजीनिअर म्हणून काम पाहतात. गेल्या दीड महिन्यापासून काम सुरू असल्याने त्याठिकाणी १८० परप्रांतीय मजूर, मिस्तरी, चालक, हेल्पर व इतर कर्मचारी काम करतात. कक्रिटींग बुम पंपाच्या काम ऑपरेटर चंद्रभुषण राम कैलास, बुम हेल्पर अरविंद कुमार गौड हे पाहतात. त्यांच्याकडे कक्रिटींग बुम पंपाचे रिमोट आणि चावी यांच्याकडेच असते. दरम्यान ९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता साईटवर काम सुरू करण्यासाठी प्रोजेक्ट इंजिनिअर सतीष परदेशी हे गेले. त्यावेळी चंद्रभुषण राम कैलास आणि अरविंद कुमार गौड हे दिसून आले नाही. मात्र त्यांच्या ताब्यात असलेले दीड लाख रूपये किंमतीचे कक्रिटींग बुम पंपाचे रिमोट आणि चावी सोबत घेवून गेल्याचे दिसून आले साईटवरील कामकाज बंद पडले आहे. त्यांचा दोघांच्या सोबत जेसीबी चालक पवन गिरी हा देखील कोणास काहीही न सांगता निघून गेल्याने बांधकामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर सतीष परदेशी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.