बहुजन मुक्ती पार्टी महानगरच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

जळगाव, प्रतिनिधी ।  शाखा विस्तरासह विविध विषयांवर  बहुजन मुक्ती पार्टी जळगाव महानगरच्या बैठकीचे आयोजन शासकीय पद्मालय विश्रामगृह येथे करण्यात आले. बैठक महानगराध्यक्ष इरफान शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

बैठकीत पार्टीच्या जळगाव शहरातील वाढ व विस्तार करणे,  जळगाव शहरातील प्रमुख चार ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे शाखा उदघाटन करण्याचे निश्चित करण्यात आले.  जळगाव महानगरपालिका व जळगाव शहराच्या प्रभागातील विविध समस्या हाती घेऊन पुढील आंदोलनाचे दिशा ठरविण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेझ, जिल्हामहासचिव  विजय सुरवाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच याबैठकीमध्ये सचिन सुरवाडे, रियाज पटेल, खुशाल सोनवणे, रियाझ शेख, देवानंद निकम, फरीद खान, सुनील देहडे, राहुल सोनवणे, सुनील पाटील, मुकेश सावकारे, नितीन इंगळे, हेमंत बटाटे,वसीम शेख,तसेच जळगाव शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content