बस-दुचाकीच्या अपघातात वयोवृध्द जागीच ठार

Accident

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालशिवकडे जात असलेल्या एसटी बसने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात ५५ वर्षीय मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, येथील यावल आगाराची बस क्रमांक (एमएच २० डी ९९०५ ) ही भालशिव मार्ग पिंप्रीकडे जात असतांना समोरून येणारी मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ बीएच ४३४५) हीस धडक दिली.त्यात मोटरसायकलस्वार पितांबर लहु सोनवणे वय ५५ वर्ष रा. पिंप्री ता. यावल पिंप्री गावाकडुन येत असतांना झालेल्या अपघातात जागीच ठार झाले.

घटनेचे वृत्त कळताच भालशिव व पिंप्री येथील ग्रामस्थ घटनास्थळी धाव जमले. यावेळी उपस्थितीत ग्रामस्थानी बस चालकास घेराव घालून धक्काबुक्की केली तर नागरीकांनी एस बसवर दगडफेक करून काचा देखील फोडल्यात या गोंधळात काही अप्रिय घटना घडण्यापूर्वी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी तात्काळ हजर झाले व त्यांनी जमावास पांगवून बस चालकास ताब्यात घेतले. याबाबत येथील पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Protected Content