जळगाव प्रतिनिधी । थकित वेतनासाठी महामंडळाच्या चालकाने आज सकाळी गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी संतप्त आगारातील कर्मचाऱ्यांनी मयत सहकाऱ्याला श्रध्दांजली अर्पण करून दुपारपासून जळगाव बसआगारातील बस फेऱ्या दोन तास बंद ठेवण्यात आल्या होत्या.

मौन श्रध्दांजली अर्पण प्रसंगी इंटक विभागीय सचिव नरेंद्रसिंग राजपूत, कामगार संघटनेचे अध्यक्ष योगराज पाटील, कास्टट्राईबचे विभागीय सचिव शैलश नन्नवरे, कामगार सेनाचे विभागीय के.पी.पाटील, विभागीय संघटनेचे अध्यक्ष विनोद शितोळे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघटनेच्या वतीने दुपार जळगाव आगारातील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. थकित वेतन मिळत नसल्याचे बस चालकाने आत्महत्या केल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाली आहे. दरम्यान कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती संघटनेने दिली आहे. दरम्यान, माजी मंत्री गिरीष महाजन यानी मयताच्या कुटुंबियांसह आगारातील कर्मचाऱ्याशी चर्चा करून मयताच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/650063452346262/