बसस्थानकात वृध्द महिलेची गळ्यातील सोन्याची लांबविणाऱ्या महिलेला पकडले

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपयाची सोन्याचे मंगळसूत्र तोडताना एका महिलेला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर शहरातील बसस्थानक परिसरामध्ये यावल तालुक्यातील अंजाळे येथील मंदाकिनी शांताराम सोनवणे (वय 66) या वृध्द महिला कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. त्या बसमध्ये चढत असताना, त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेली महिला राधाबाई कैलास गाडे (वय-४५, रा. तांबापुरा जळगाव) या महिलेला चोरी करतांना रंगेहात पकडले. या संदर्भात वृद्ध महिलेने रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित महिला राधाबाई कैलास गाडे या या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.

Protected Content