यावल प्रतिनिधी । येथील यावल-भुसावळ बसने प्रवास करणाऱ्याचे सोन्याची दागीने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगार पोलीसांच्या धडक कार्यवाही गजाआड झाले.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, आज ०२ रोजी पहाटेच्या सुमारास मनाली नितीन मराठे, (वय.३२) या भुसावळ ते अंजाळे असे एस.टी.क्र. MH-40-N-9036 ने प्रवास करीत असताना ४ चोरटे नामे- दौजी बाहुरी सिंग (वय.४५, रा. उतरप्रदेश), रिजवान मुनाफ झोजे (वय.३६, रा. उतरप्रदेश) , कदीम मुस्ताक झोजे (वय.२६ रा. गुजरात), व खुर्शीद महंमद ईर्शाद (वय.२६ रा. उत्तर प्रदेश) यांनी प्रवासा दरम्यान मनाली मराठे यांची बँग कापून त्यातील सोन्याचे दागिने एकुण ७० ग्रँम किमंत रुपये १ लाख ७५ हजारांचा मुद्धेमाल चोरी केल्याचे निदर्शनास आले. एसटी बसचे वाहक एस.पी.महाजन यांनी समय सुचकता बाळगुन क्षणाचाही विलंबन लावता लागलीच फोनव्दारे यावल पोलीस स्टेशनला कळविताच पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी तात्काळ दखल घेत विलंब न करता आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळावर धडक देऊन चोरट्यांना तात्काळ जेरबंद केले व त्यांच्या ताब्यातील चोरलेले दागीने हस्तगत केलीत. यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी केलेल्या या कार्यवाही मुळे एसटी बसमधील प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासांनी त्यांचे कार्यतत्परता राखविल्याबद्दल आभार व कौतुक करण्यात येत आहे .