नवी दिल्ली। आज देशभरात राष्ट्रीय किसन दिवस साजरा होत असतांना शेतकऱ्यांना दुर्दैवाने राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर शेतकऱ्यांचा आंदोलन करावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि खासदार शरद पवार यांनी बळीराजाला न्याय मिळावा हीच सदिच्छा व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देतांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनाची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो असे ट्विटर पवार यांनी केलंय. शेतकरी आंदोलन थांबविण्यास सरकारला यश आले नसल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे
.