बेंगळूरू (वृत्तसंस्था) कर्नाटकातील धारवाड येथे आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आपल्यावर बलात्कार झाल्यानंतर विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कर्नाटकातील धारवाड येथील १४ वर्षीय मुलगी आठवीत शिकत होती. ३० जुलैला बोगूर येथे मंदिरातून घरी परत येत असताना तिच्यावर बलात्कार झाला. त्यानंतर मुलीने घरी आल्यावर विष घेऊन आत्महत्या केली. अत्यावस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतू तिचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.