तासगाव (वृत्तसंस्था) बलात्काराची व्हिडीओ शूटिंग करून ते समाजात दाखवून बदनामी करण्याची भीती दाखवीत एका विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार तासगाव तालुक्यातील गौरगाव येथील घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर भोरे (रा. गौरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत पिडीत विवाहितेने सांगीतले की, ती गौरगाव येथे पतीसह राहते. आरोपीशी ओळख झाल्यानंतर तो अनेकदा तिला आमिष दाखवायचा. तू मला आवडतेस. मी तुला सुखात ठेवीन. तुझ्यासाठी बायकोला सोडचिठ्ठी देईन, असे सांगायचा. त्यानंतर दि. 3 नोव्हेंबर 2018 रोजी सागरने पिडीत विवाहितेस फूस लावून पळवून नेले. मिरज येथे मित्राच्या शेतातील खोलीत त्याने एका मित्रासह पिडीतेवर बलात्कार केला. या प्रकारानंतर पोलिसात ताकार दाखल करण्यात आली. यानंतर सहा महिन्यांपूर्वी सागरने तीन मित्रांच्या मदतीने तिला कारमधून पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी सोबत असणार्या तीन मित्रांनी व्हिडीओ शूटिंगही केले आहे. याबाबत कुठे बोललीस तर समाजात बदनामी करीन, अशी धमकी दिली. त्यानंतर वारंवार व्हिडिओची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार करीत होता असेही पिडीत विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.