धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे बुधावरी १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दोनजण ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण नंदलाल जैस्वाल (मध्य प्रदेश) आणि राधेशाम शरद जाखेटे (रा. वडगाव बु. ता. चोपडा ह.मु फॉरेस्ट कॉलनी जळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.
सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुण बुधवारीर १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वेगवेगळ्या दुकानांवर जात त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. यात भाजीपाला विक्रेते विजय प्रकार बडगुजर (वय-४३) रा. पिंप्री ता. धरणगाव यांना ५०० ची नोट बनावट असल्याचे लागलीच लक्षात आले. त्यामुळे त्यानी तातडीने धरणगाव पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीसांनी संशयित आरोपी प्रविण जैस्वाल आणि राधेशाम जाखेटे यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ५०० रूपयांच्या २७ नोटा हस्तगत केल्या आहे.
भाजीपाला विक्रेत विजय बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुरूवार १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.