जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग रेल्वे पुलाच्या बोगद्यातून गणेश कॉलनीत जाणाऱ्या मालवाहू वाहन उंचीरोधक लोखंडी खांब्यात अडकल्याचा प्रकार आज सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरामुळे अर्धातास वाहतूकीची कोंडी झाली होती.
शहरातील एसएमआयडी कॉलेजकडून गणेश कॉलनीत जाण्यासाठी बजरंग रेल्वे पुलाच्या बोगद्यातून जावे लागते. या बोगद्यातून मालवाहू वाहनांना जाण्यास मनाई आहे तसे लोखंडी उंचीरोधक खांबे लावण्यात आलेले आहे. आज सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मालवाहू छोटाहत्ती (एमएच १८ बीजी ४८४७) क्रमांकाचे वाहन बोगद्यातून गणेश कॉलनीकडे जात असतांना उंचीरोकध असल्याने बोगद्यातच वाहन अडकले होते. सुमारे अर्धातास वाहतूकीची कोंडी झाली होती. काही रिक्षाचालकांच्या मदतीने मालवाहून वाहनाच्या मागे उभे असलेल्या वाहनांना मागे करून मालवाहू वाहन काढण्यात यश आले. या प्रकारामुळे वाहनधारकांना चांगलाच मनस्ताप करावा लागला. दरम्यान बोगद्याच्या दोन्ही बाजूला उंची रोधक लोखंडी खांब लावण्याची मागणी नागरीकांसह वाहनधारकांकडून केली जात आहे.