जळगाव प्रतिनिधी । महिला गृह उद्योगाच्या नावाने बचत गटाच्या महिलांची ११ लाख २० हजार रुपयात फसवणूक करणाऱ्या प्रज्ञा संजीवन महिला फांउडेशनच्या दोन महिलांना जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयतीन कोठडी सुनावली.
अधिक माहिती अशी की, प्रज्ञा संजीवन फांउडेशन महिला उद्योगाच्या नावाने महिलांना रोजगार व उद्योग मिळवून देण्याच्या नावाखाली भानुदास शिवाजी पवार (जिल्हा पेठ, जळगाव) व वैशाली श्यामकुमार सोलंकी (रा.दत्त कॉलनी, शाहू नगर) यांनी नीता संजय बारी (३८, रा.कुऱ्हे पानाचे, ता.भुसावळ) यांच्यासह चित्रा सूरज पाटील, आयशा शेख इसाक, वंदना भरत जाधव, सविता किशोर बारी, सविता कमलाकर बारी, कविता प्रदीप बारी, सुनीता नीलेश मेश्रामकर, ज्योत्सना किरण पाटील, समरीश शेख शाहरुख, विद्या उत्तम तायडे, सुजाता महेंद्र गाडे, सुनीता पाटील व हेमलता इंगळे या १४ महिलांना सभासद केले होते. त्यासाठी सभासद शुल्क म्हणून १०० तर अनामत म्हणून ३०० असे एका महिलेकडून ४०० रुपये घेण्यात आले होते.या महिलांच्याव्यतिरिक्त इतर महिलांनीही शुल्क भरले. त्याचा आकडा ११ लाख २० हजारापर्यंत गेला. पैसे भरल्यानंतरही या महिलांना रोजगार मिळाला नाही, त्यांच्याकडून टोलवाटोलवी होत असल्याचे पाहून नीता बारी यांनी फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. जानेवारी २०२० मध्ये हा प्रकार झाला होता. सपोनि महेंद्र वाघमारे यांनी भानुदास पवार व वैशाली सोलंकी या दोघांना अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.