यावल प्रतिनिधी । बकरी ईद १ ऑगस्ट रोजी असल्याने मुस्लीम बाधावांचा हा सण श्रद्धा त्याग व बलीदानाचे प्रतिक असून आपण देखील देशावर आलेल्या कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सण मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमानुसार साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी केले.
पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनच्या आवारात मुस्लिम बांधवांसह बैठक घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. देशावर आलेल्या कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सर्व नागरीकांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी शासनाने लॉक डाऊनच्या माध्यमातून नियम व अटीशर्ती लावुन दिल्या आहे. नागरिकांनी या सुचनांचे काटेकोर पालन करावे व कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता इतरांच्या भावनांचा आदर करून अगदी साध्यापणाने आपल्या घरीच कुटुंबासोबत बकर ईदची नमाजपठण शांततेने ईद साजरी करावी असे आवाहन श्री. धनवडे यांनी केले. बैठकीत यावल शहरातील विविध मुस्लीम समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, मस्जीद ट्रस्टचे विश्वस्त, मौलाना, मौलवी आणी समाजसेवक या बैठकीस उपस्थितीत होते. यात हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, हाजी ईकबाल खान, नसीर खान, हाजी शेख याकुब शेख चॉद, समाजसेवक हबीब मंजर यांच्यासह आदी मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.